Fort chi Aai Icchadevi Maa (Amar Mitra Mandal 2017)
|| अमर मित्र मंडळ ||
|| फोर्टची आई इच्छादेवी मां ||
मंडळाचा इतिहासमंडळाची स्थापना १९७९ साली झाली आहे. या वेळी मंडळाचा परिसरामध्ये एक लहान मंदिर होते. ज्याचे रुपांतर आज एका भव्य मंदिरात झाले आहे . मंदिरात दर्शनासाठी रोज भाविक येत असतात. या मंदिरात अंबे मातेची प्राणप्रतिष्ठा केलीली मोहक मूर्ती आहे. देवीची ही जागृत असून ही देवी नवसाला पावते .येथे सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात अशी ख्याती असुन ह्या देवीला इच्छादेवी मां असा सुद्धा बोलले जाते. मंदिरात दर वर्षी एप्रिल महिन्यात चंडीहवन आणि महाप्रसादाचा कार्यक्रमा मंडळाच्या वतिने करण्यात येतो. भांडाऱ्यात कमीत कमीत २-३ हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. तसेच भव्य महलाचीसजावट केले जाते. नवरात्रोत्सवच्या काळात देवीला २००-२५० साड्या अर्पण होतात.नवरात्री मध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या साड्या नेसवल्या जातात. मंडळात सर्व उत्सव खूप उत्साहाने साजरा केले जातो. प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी मंडळच्या वतीने इच्छादेवी प्रेमियर लीगचे आयोजन करण्यात येत असतात. या मध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असतो. नवरात्री मध्ये देवीचे आगमन मोठ्या थाटामाताट आणि जल्लोषात पार पडत असतात. मूर्ती कमीत कमीत १० फुटाची असते. दर रोज नवीन कार्यक्रम होत असतात ज्यात अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांचा सहभाग असतो. मूर्तीचे विसर्जन अगदी पारंपारिक पद्धतीने मंडळातील लहान मुलांपासून ज्येष्टांसह महिलांच्या हजेरीत देवीला निरोप दिला जातो.
कार्यक्रम
१- नवरात्रोत्सव, २- वह्या वाटप, ३-विद्यार्थी गुण गौरव, ४-दही हांड़ी, ५-गणेशोत्सव,
मंडळाचे मूर्तिकार
१९७९-१९९० श्री. आर. वी. मादुस्कर (गिरगाव)
१९९१ -२०१७ श्री. रमेश रावले (लालबाग)
मंडलाचे कार्यकारणी सदस्य
अध्यक्ष - श्री. हशमुख वाघेला, उपाध्यक्ष - श्री. नरेश वाघेला, सेक्रेटरी - श्री चिमन सोलंकी खजिनदार - श्री कैलाश चौहान, उप खजिनदार - श्री राजेश वाघेला, सलाहगार - जगदीशजी सोलंकी (महाराज )
संपर्क : उमेश वाघेला 98697 83443
स्थल: इच्छादेवी माँ मंदिर, सेंट ज्योर्जेस रुग्णालय, चाल - २२, पि. डी. रोड, सी. एस. टी., मुंबई ४०० ००१
इच्छादेवी मातेचा विजय असो
ReplyDelete