SARVAJANIK SHRI NAVRATRA MOHASTAV MANDAL (REG.) DADARCHI BHAVANI MATA/सार्वजनिक श्री नवरात्र महोत्सव मंडळ (रजि.) दादरची भवानी माता

SARVAJANIK SHRI NAVRATRA MOHASTAV MANDAL (REG.)  DADARCHI BHAVANI MATA/सार्वजनिक श्री नवरात्र महोत्सव मंडळ (रजि.) दादरची भवानी माता

दादरची भवानी माता

मंडळाचा इतिहास 
आपले मंडळ ८३ व्या वर्ष्यात पदार्पण करत आहे अष्टमीला देवीला भव्य भंडारा आयोजित केला जातो ह्यात १५०००-२०००० आबालवृद्ध लाभ घेतात कब्बडी सामने आयोजित केला जातो या मंडळाची स्थापना १९३६ साली झाली आहे कै. भगवान दादा पालव सिनेमासृष्टीतील नावाजलेले नाव या मंडळाचे महत्वाचे सदस्य
स्वातंत्रपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जनजागृती व लोक संघटित व्हावे याकरीता सार्वजनिक उत्सव हे माध्यम वापरण्याचा बीज मंत्र दिला त्याचीच परिणिती म्हणजेच आमचा हा सार्वजनिक नवरात्र महोत्सव १९३६ साली हिंदमाता -भोईवाडा विभाग,दादासाहेब फाळके मार्ग,डॉ आंबेडकर मार्ग मुंबई ग्रंथसंग्रहालय मार्ग येथील रहिवाशांनी हे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ स्थापन केले स्वातंत्रपूर्व काळ म्हणजे मोठ्या धामधुमीचा काळ ब्रिटिश राजवटीत टक्कर द्यायचा काळ अधून मधून जातीय दंगली उसळत असत लोकजागृती व एकसंघपणाच्या भावनेतून नवरात्र उत्सव साजरा केला गेला पहिला २५ ऑक्टोबर १९३६ साली साजरा झाला

नवरात्रीमध्ये विशेष कार्यक्रम 
देवीची आरती ,देवीची गोंधळ ,हळदीकुंकू समारंभ,भवानी मातेला साड्याचा लिलाव ,लहान मुलांच्या स्पर्धा,कब्बडी महोत्सव ,होमहवन,देवीला भव्य भंडारा,आरोग्य शिबीर 

मूर्तिकार
श्याम सारंग साहेब (जवाहरलाल नेहरू हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता )

कार्यकारणी 
अध्यक्ष : श्री.शिवाजी गणपत मोरे   कार्याध्यक्ष : श्री हरदीपसिंग अमरदीपसिंग अहुवालिया (लाली)
प्रमुख कार्यवाह : श्री सुनील रामचंद्र कांबळी ,सहाय्यक कार्यवाह : श्री सुरेश उमाजी मोरे
संयुक्त खजिनदार : श्री रमाकांत सखाराम कारेकर, श्री लक्ष्मण आनंदा वाडकर ,श्री लवु रामचंद्र मिरगळ माननीय सल्लागार :श्री राहुल शेवाळे ( खासदार ) ,श्री कालिदास कोळंबकर (आमदार) श्री मुनील मोरे (नगर सेवक
      
रजिस्टर नंबर :१६७९७ 

जवळचे स्टेशन : दादर ईस्ट 
पत्ता : डॉ . बाबासाहेब आंबेडकर रोड ,दादासाहेब फाळके रोड ,शंकर अंबाजी पालव मार्ग ,मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्ग व आसपास दादर मुंबई ४०००१४















Comments

Popular posts from this blog

BYCULLA DAGDI CHWAL SARVAJANIK NAVRATRUSTAV MANDAL ( DAGDI CHWAL CHI MAULI /भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दगडी चाळीची आई माउली )

Saatrastachi Mauli सातरस्त्याची माऊली (बाल गोपाळ नवरात्रौत्सव मंडळ)

Shivai Mandal Sarvajanik Navratrotsav (Aai Shivai) शिवाई मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव (आई शिवाई )