GOLDEN KRIDA MANDAL WORLICHI DURGAMATA / गोल्डन क्रीडा मंडळ (वरळीची दुर्गामाता)
GOLDEN KRIDA MANDAL (WORLICHI DURGAMATA) / गोल्डन क्रीडा मंडळ (वरळीची दुर्गामाता)
वरळीची दुर्गामाता
मंडळाचा इतिहास
मंडळाची स्थापना १९६९ ला मोठ्या श्रेद्धेने देवीची मूर्ती बसवून सुरवात करण्यात आली मंडळाचे कार्यकर्ते स्वतः सर्व डेकोरेशनच्या वस्तू आणून डेकोरेशन मंडप तयार करत असे व स्वतः च ढोल आणि ताशे वाजवून गरबा आयोजित करत असे सदर वर्ष हे मंडळाचे सुवर्ण महोत्सवी ( ५० वे ) वर्ष आहे वरळी विधान सभा विभागातील सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या मंडळापैकी हे एक जुने असे मंडळ आहे
वैशिष्ट
मुंबई वरळी विधान सभा विभागातील नावाजलेला मंडळ अशी ख्याती, दर वर्षी सजावटी मध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण देखावा करण्यात मंडळ अग्रेसर असतो आणि ते पाहण्यासाठी भाविक रोज दर्शनासाठी येत असे, मंडळ आपल्या भव्य आगमन आणि विसर्जन मिरवणूकीसाठी मुंबई वरळी विधान सभा विभागात ओळखले जाते
नवरात्रीमध्ये विशेष कार्यक्रम
आरोग्य शिबीर,रास गरबा ,लहानमुले व मुलींसाठी चमचा गोटी,चित्रकला,स्मरणशक्ती,मुलींसाठी रांगोळी मेणबत्ती स्पर्धा ,महिलांसाठी -हळदीकुंकू पाककला व कोजागिरी निमित्त महाप्रसाद कोजागिरीला देवीला आलेल्या साडयांचा लिलाव असे बरेच कार्यक्रम राबिवले जातात
नवरात्री दरम्यान राबिवले जाणारे उपक्रम
गेले २५ वर्ष मंडळ महाप्रसादाचे आयोजन करते मंडळाचे सल्लागार श्री.प्रमोद अडसूळ ,श्री चंद्रकांत तोडणकर,श्री चेतन शिरोडकर ,व श्री राम गट्टाणी हि मंडळी ह्यात विशेष फुढाकार घेतात एकंदरीत १० ते १५ हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात
मूर्तिकार : श्री चिरणेकर ( चवणी गल्ली प्रभादेवी मुंबई ४०००२५ )
कार्यकारणी
संस्थापक : कै. शांताराम विश्वनाथ रुमडे
अध्यक्ष : श्री रोशन गजानन पावसकर उपाध्यक्ष : श्री हेमंत साखरकर
सरचिटणीस : कुमार सप्तेष किर
खजिनदार : कुमार.कैलास लांजेकर उपखजिनदार : कुमार चंद्रकांत पाटील
सल्लागार: श्री प्रमोद अडसूळ ,सी चेतन शिरोडकर
रजिस्टर क्रमांक : जी.बी.बी.एस.डी./१६८५/२००१
संपर्क : श्री रोशन गजानन पावसकर (७५०६३०४२२२/८९७६५३३३१३ )
जवळचे स्टेशन : दादर
Comments
Post a Comment