Mumbaichi Mauli (Navtarun Mitra Mandal) नवतरुण मित्र मंडळ (मुंबईची माऊली)
नवतरुण मित्र मंडळ मुंबईची माऊली मंडळाचा इतिहास सन २००० साली धार्मिक भावनेतून मंडळाची स्थापना करण्यात आली होती. स्थापनेपासून ते आजपर्यंत युवा कार्यकर्ते नवरात्रौत्सवाच संपूर्ण व्यवस्थापन करतात. २०१५ साली रूद्रामा देवीच्या अवतारातील विजय खातू यांनी साकारलेली देवीची मूर्ती नवरात्रौत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती . त्याच वर्षी भक्तांनी मुंबईची माऊली हे नाव दिले. वैशिष्ठ मुंबईतील सर्वात मोठा नेत्रदीपक नवरात्रौत्सव सोहळा असा नावलौकिक असलेल्या मुंबईच्या माऊलीची विलोभनीय मूर्ती महाराष्ट्रच्या नवरात्रौत्सवाचा केंद्रबिंदू असते. दरवर्षी नावीन्यपूर्ण प्रभावळ मंडळाच्या कार्यकर्त्याच्या संकल्पनेतून तयार होत असते. सुमारे १२ तास आगमन मिरवणूक सोहळा असणारा एकमेव मंडळ आहे. मंडळाचे मार्गदर्शक आणि प्रमुख आधारस्तंभ राजू राव यांच्या संकल्पेनेतुन संपूर्ण सजावट तसेच आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच नियोजन करण्यात येते. अष्टमीच्या दिवशी देवीचा मळवट भरल्यानंतर देवीचा तेजस्वी रूप बघण्यासाठी भक्तांची रिघ लागते. नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम नवरात्रौत्सवात प्रामुख्य...