Mumbaichi Mauli (Navtarun Mitra Mandal) नवतरुण मित्र मंडळ (मुंबईची माऊली)

नवतरुण मित्र मंडळ

मुंबईची माऊली 


मंडळाचा इतिहास
सन २००० साली धार्मिक भावनेतून मंडळाची स्थापना करण्यात आली होती. स्थापनेपासून ते आजपर्यंत युवा कार्यकर्ते नवरात्रौत्सवाच संपूर्ण व्यवस्थापन करतात.
२०१५ साली रूद्रामा देवीच्या अवतारातील विजय खातू यांनी साकारलेली देवीची मूर्ती नवरात्रौत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती . त्याच वर्षी भक्तांनी मुंबईची माऊली हे नाव दिले.

वैशिष्ठ
मुंबईतील सर्वात मोठा नेत्रदीपक नवरात्रौत्सव सोहळा असा नावलौकिक असलेल्या मुंबईच्या माऊलीची विलोभनीय मूर्ती महाराष्ट्रच्या नवरात्रौत्सवाचा केंद्रबिंदू असते. दरवर्षी नावीन्यपूर्ण प्रभावळ मंडळाच्या कार्यकर्त्याच्या संकल्पनेतून तयार होत असते. सुमारे १२ तास आगमन मिरवणूक सोहळा असणारा एकमेव मंडळ आहे. मंडळाचे मार्गदर्शक आणि प्रमुख आधारस्तंभ राजू राव यांच्या संकल्पेनेतुन संपूर्ण सजावट तसेच आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच नियोजन करण्यात येते. अष्टमीच्या दिवशी देवीचा मळवट भरल्यानंतर देवीचा तेजस्वी रूप बघण्यासाठी भक्तांची रिघ लागते.

नवरात्री मध्ये विशेष कार्यक्रम
नवरात्रौत्सवात प्रामुख्याने अवयवदानासंदर्भात जनजागृती आणि शिबिराच आयोजन करण्यात येते.

उपक्रम
२०१४ साली मंडळाकडून पुणे जिल्ह्यातील मालीन गावातील दरडग्रस्तांना घटनास्थळी जावून मदत करण्यात आली होती.

मूर्तिकार
रेश्मा खातू (कै विजय खातू सर ) परेल कार्यशाळा

रजिस्ट्रेशन नंबर : महाराष्ट्र राज्य मुंबई ९७ जी बी बी एस डी

कार्यकारणी मंडळ 
अध्यक्ष : अविनाश किरवे, कार्याध्यक्ष:-राहुल घाणेकर, उपाध्यक्ष: - निशांत शेट्टी, सरचिटणीस : स्वप्नील मिरगुंडे, खजिनदार: गणेश धुमाळ, उपखजिनदार: पंकज खेडकर, सल्लागार: मंगेश म्हात्रे 

संपर्क प्रमुख  : राहुल घाणेकर ८८९८२८८३२०
जवळील स्टेशन :. हार्बर मार्गावरील गुरु तेग बहादुर स्टेशन १० मिनिटांच्या अंतर
कार्यालय पत्ता  : मुंबईची माऊली पटांगण , प्रतीक्षा नगर , सायन , मुंबई -४०००२२


पेपर कटिंग अँड पिकस









Comments

Popular posts from this blog

BYCULLA DAGDI CHWAL SARVAJANIK NAVRATRUSTAV MANDAL ( DAGDI CHWAL CHI MAULI /भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ ( दगडी चाळीची आई माउली )

Saatrastachi Mauli सातरस्त्याची माऊली (बाल गोपाळ नवरात्रौत्सव मंडळ)

Shivai Mandal Sarvajanik Navratrotsav (Aai Shivai) शिवाई मंडळ सार्वजनिक नवरात्रौत्सव (आई शिवाई )